0
संयुक्त अरब अमिरातीतील मोबाईल कंपनी थुरायाने जगातील पहिला सॅटेलाइट स्मार्टफोन लाँच केला असून हा फोन अँड्राईड ओएस वर चालणार आहे. हा फोन एक्स फाईव्ह टच या नावाने लाँच केला गेला असून डिसेम्बर पासून त्याची विक्री सुरु होत आहे. जगातील १६० देशात तो सादर केला जात असून ब्रिटनच्या बाजारात तो जानेवारी अखेरी येईल. भारतात हा फोन कधी येणार याची माहिती मिळू शकलेली नाही.
हा फोन ड्युअल सीम आहे. त्यातील एक सीम टू, थ्री, फोर जी नेटवर्क सपोर्ट करेल तर दुसरे सीम सॅटेलाईटला सपोर्ट करणार आहे. या फोनला ५.२ इंची आयपीएस डिस्प्ले, अँड्राईड ७.१ नगेट ओएस, २ जीबी रॅम, १६ जीबी स्टोरेज, ८ एमपीचा रिअर तर २ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. हा वॉटरप्रुफ आणि डस्टप्रुफ असून त्याची किंमत आहे ९९९ इयुआर म्हणजे ८१ हजार रुपये.thuraya

Post a comment

 
Top