आंध्र प्रदेशची राजधानी असलेल्या अमरावती शहरात जगातील सर्वात उंच विधान भवन उभारण्याचा निर्णय आंध्र प्रदेश सरकारनं घेतला आहे. हे विधान भवन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये उभारलेल्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'हून ६८ मीटर उंच असेल. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी नुकतंच या इमारतीच्या आराखड्यावर शिक्कामोर्तब केलं असून विधानसभेत तसा प्रस्ताव संमत करण्यात येणार आहे. त्यानंतर इमारतीचं बांधकाम सुरू होणार आहे. अमरावती:
आंध्र प्रदेशची राजधानी असलेल्या अमरावती शहरात जगातील सर्वात उंच विधान भवन उभारण्याचा निर्णय आंध्र प्रदेश सरकारनं घेतला आहे. हे विधान भवन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये उभारलेल्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'हून ६८ मीटर उंच असेल. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी नुकतंच या इमारतीच्या आराखड्यावर शिक्कामोर्तब केलं असून विधानसभेत तसा प्रस्ताव संमत करण्यात येणार आहे. त्यानंतर इमारतीचं बांधकाम सुरू होणार आहे.
पंतप्रधान मोदी यांनी गुजरातमध्ये १८२ मीटर उंच स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारल्यानंतर राज्या-राज्यांमध्ये टोलेजंग व भव्यदिव्य वास्तू उभारण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ रामाची भव्य मूर्ती उभारणार आहेत. त्यांचंच अनुकरण करत नायडू यांनी आता अमरावतीत उंच विधान भवनाची तयारी केली आहे. या इमारतीचा आराखडा लंडनच्या नॉर्मा फॉस्टर्स कंपनीने तयार केला आहे. मुख्यमंत्री नायडू यांनी स्वत: यात लक्ष घातलं असून डिसेंबर २०२०पर्यंत या इमारतींचं बांधकाम पूर्ण होईल, असा अंदाज आहे. अमरावती शहराला गतवैभव परत मिळवून देण्याचा चंग नायडूंनी बांधला आहे. विधान भवनाची भव्य इमारत उभारणं हा त्याचाच एक भाग आहे.
अशी असेल इमारत
>> ही इमारत २५० मीटर उंच असेल. त्यात तीन मजले आणि एक टॉवर असेल.
>> गुजरातमधील 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'पेक्षा ही इमारत ६८ मीटर उंच असेल.
>> या इमारतीचा आकार उमलणाऱ्या फुलासारखा असेल.
>> विधान भवनाच्या आजूबाजूला सचिवालयांच्या पाच इमारती असतील.
>> नव्या विधान भवनाच्या इमारतीत दोन गॅलऱ्या असतील. यातून संपूर्ण अमरावती शहर लोकांना पाहता येईल.
>> विधानभवनाची एक गॅलरी पूर्णपणे काचेची असेल.
Recommended By Colombia
ताजी प्रतिक्रिया
या इमारतीचा आराखडा लंडनच्या नॉर्मा फॉस्टर्स या कंपनीने तयार केला आहे???????? मोदिजिन्च्या मेक इन इंडिया ला सुरुंग लावण्याचे दळभद्रि प्रकार.. दुसरे काय??

Post a Comment