0
  दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना दिलासा दिला आहे. दिवाळीच्या निमित्ताने मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. तर भुसावळ, मनमाड मार्गे काही गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दिवाळीच्या सुटय़ांसाठी गावी निघालेल्या प्रवाशांना याचा फटका बसला आहे.
मात्र हार्बर रेल्वेवर सीएसएमटी- चुनाभट्टी/ वांदे दरम्यान सकाळी 11.40 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांदे मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे. सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांदेपर्यंत सकाळी 11.40 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी-सीएसएमटी मार्गावर सकाळी 11.10 ते संध्याकाळी 4.40 वाजेपर्यंत सेवा खंडित राहील. या कालावधीत पनवेल ते कुर्लासाठी काही विशेष लोकल चालवल्या जातील.

Post a Comment

 
Top