0
  • बारामती - काळा पैसा लोकांच्या खात्यात जमा करण्यासाठी विरोधकांनी वारंवार संसदेत तगादा लावल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वित्झर्लंडचा दौरा केला. दौऱ्यात त्यांना स्वीस बँकेत जमा रकमेविषयी माहिती देण्याबाबत स्वीस सरकारने असमर्थता दर्शविली. त्यामुळे परदेशातील काळा पैसा भारतात आणून अर्थव्यवस्था सुधारण्याचे स्वप्न दिवा स्वप्नच राहिले. अन्य देशातील भारतीयांच्या बँक खात्यांची माहिती बाहेर आली. मात्र सरकारचे काळ्या पैशाविषयीचे धोरण फसल्याने काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नवीन नोटाबंदी धोरण राबवल्याची टीका करत शरद पवार यांनी बारामतीत केली.

    बँकेच्या वैशिष्ट्यांनी धनिक व्यापाऱ्यांसमोर उजळणी करताना पवार म्हणाले की, जगात पैसा ठेवण्याची तीन-चार केंद्र आहेत. त्यापैकी स्वीस बँकेतील गुंतवणूकदारांची माहिती कधी बाहेर दिली जात नाही. स्वीस बँकेत गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदाराला स्वत: जावे लागते. काही नेमलेल्या कंपन्यांना गुंतवणूकदारांनी सूचना दिल्यावर बँकेतून रक्कम काढणे, रक्कम टाकणे, एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करणे, आदी कामे केली जातात. या सर्व कामांसाठी गुंतवणुकदाराच्या सहीची गरज नसते. त्यामुळे गुंतवणूक करणाऱ्याला आधार वाटतो. त्यामुळे स्वीस बँकेत पैसा ठेवण्याची प्रवृत्ती जगातील अनेक धनिकांमध्ये आहे. भारतातील गुंतवणूक मोठी नसली तरी स्वीस बँकेत गुंतवणूक आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार आदीSharad Pawar revises Swiss bank's investor base, rich in banking features
  •  उपस्थित होते.

Post a Comment

 
Top