पाच राज्यांच्या निवडणुकीची तारीख जस जशी जवळ येत आहे. त्याप्रमाणे राजकीय पक्षांचा उमेदवारांना तिकिट देण्यावरून गोंधळ उडतोय. छत्तीसगडमध्येही असाच एक प्रकार समोर आला आहे. तिकीट वाटपावरून काँग्रेसच्या कार्यालयात गोंधळ झाला आहे. रायपूर दक्षिण जागेवरच्या उमेदवारासाठी काँग्रेस समर्थकांनी कार्यालयात तोडफोड केली आहे. नाराज कार्यकर्त्यांनी खुर्च्यांनाही तोडून टाकल्यात. रायपूर दक्षिणमधून कन्हैय्या अग्रवाल यांना काँग्रेसने तिकीट दिल्याने कार्यकर्ते नाराज आहेत.
रायपूरच नव्हे, तर बिलासपूरमधल्या तिकीट वाटपावरूनही काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ आहे. या जागेवरून भाजपाचे बृजमोहन अग्रवाल विजयी होत आले आहेत. त्यामुळेच काँग्रेसने जातीय समीकरण जोडून कन्हैय्या अग्रवाल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उदेकानंतर पक्षाचे नेते आर. तिवारीही यांनीही कार्यकर्त्यांचे समर्थन केले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना समोर आल्या आहेत. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. गोंधळ घालणाऱया कार्यकर्त्यांना समजावण्यात येणार आहे. भाजपा नेतृत्त्वाने फारसे महत्त्व न दिल्याने नाराज झालेल्या करुणा शुक्ला यांनी 2014 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने त्यांना बिलासपूरमधून उमेदवारी दिली. मात्र त्या अपयशी ठरल्या हो

Post a Comment