0
मुंबई, 21 नोव्हेंबर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्याआधी सेनेचा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्येतील सभेत पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 
उद्धव ठाकरे हे अयोध्येतल्या दौऱ्यादरम्यान 25 नोव्हेंबरला जाहीर सभा घेणार आहे. त्यांच्या सभेला उत्तरप्रदेश पोलिसांनी परवानगी परंतु, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी परवानगी मागितली नसल्याचं म्हटलं आहे. उत्तरप्रदेश पोलिसांकडून आम्ही सभेसाठी मुळात परवानगी मागितलीच नाही. अयोध्या काही पाकिस्तानात नाही, त्यामुळे सभेला परवानगी कशाला मागायाची असा सवाल राऊत यांनी उपस्थितीत केला. 
उद्धव ठाकरे शरयू नदीच्या किनाऱ्यावर आरती करणार आहे. आरती करायलाही परवानगी हवी आहे का? शरयू नदीवर कार्यक्रम आटोपल्यानंतर आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेणार आहोत त्यालाही परवानगीची गरज नाही असंही राऊत म्हणाले.
तसंच उद्धव ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा आहे. ती त्या सरकारने पुरवणं गरजेचं आहे आणि त्यांना ती पुरवावी लागणारच आहे असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. 
दरम्यान, आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतून वारकरी अयोध्येला निघाले आहे. एका विशेष रेल्वेनं मोठ्या संख्येनं हे वारकरी टाळ मृदुंगाचा गजर करत अयोध्येला रवाना झाले आहेत. 25 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे अयोध्या दौ-यावर जाणार आहेत.
अयोध्या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का

Post a comment

 
Top