0
शहरात स्वाईन फ्लू, डेंग्यूच्या साथीच्या रुग्णाची संख्येत वाढ होत आहे. माणंसे मरत आहे. महापालिका प्रशासन नेमके करते तरी काय असा सवाल आमदार राजेश क्षीरसागर यांनी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना केला. पंचगंगा, रंकाळा व शहरातील खणींची दुरवस्था झाली आहे. मनपाचे दवाखान्यामध्ये गैरसोय होत आहे. कचरा कोंडळयात ढिग पडले आहेत. हे प्रश्न कायमचे मार्गी लागण्यासाठी ऑक्शन प्लॅन करा, असे आदेशही आमदार क्षीरसागर यांनी महापालिकेचे आयुक्तांना दिले. कामचुकार कर्मचाऱयांवर कारवाई करा, अशी सूचनाही त्यांनी केली. शहरातील डेंग्यू, स्वाईन फ्लूसह विविध प्रश्नासंदर्भातील महापालिकेमधील आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते.
आमदार क्षीरसागर म्हणाले, शहरामध्ये डेंग्यू, स्वाईन फ्लू साथीने थैमान घातला आहे. डेंग्यूने एका फुटबॉल खेळाडूचा मृत्यू झाला. अशी परिस्थिती असताना प्रशासन गप्प का बसले आहे. सीपीआरमध्ये जिल्हय़ातील रुग्ण जिल्हय़ातून उपचारासाठी येत असल्याने महापालिकेची रुग्णालय शहरातील रुग्णांसाठी सज्ज ठेवावीत. तातडीने साथ अटोक्यात आणावी. शहरात ठिकठिकाणी कचऱयाचे साम्राज्य झाले आहे. नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. झुम प्रकल्प येथील कचऱयाचा प्रश्न केव्हा मार्गी लागणार आहे. येथील नागरीकांना भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.
पंचगंगा नदी, रंकाळा तलाव, इराणी खण, कोटीतीर्थ खण व टाकळा खण प्रदूषीत झाल्या आहेत. या प्रदूषणामुळे परिसरात डासाचा प्रदुर्भाव वाढला आहे. येथील प्रदूषणाचा आढावा घेवून तातडीने उपाय योजना करा. आरोग्य विभागातील कर्मचारी वॉर्डमध्ये हजर नसतात. त्यामुळे कचरा उठावावर परिणाम होत असून संबंधितांवर कारवाई करा असेही आमदार क्षीरसागर यांनी सांगितले.
विशाल देवकुळे यांनी टाकाळा खणीमध्ये घाणीचे साम्राज्य आहे. परिसरात डासाचे प्रमाण वाढले आहे. अधिकाऱयांनी सायंकाळी एक तास या परिसरात थांबून दाखवावे, असे आव्हान केले. यावेळी माजी उपमहापौर उदय पोवार, रवीकिरण इंगवले यांनी मनपाच्या गैरकारभाराचा पाढाच वाचला. 
आयुक्त डॉ. अभिजित चौधरी म्हणाले, काही ठिकाणी कंटेनर फुटलेले आहेत. तसेच कर्मचारीही गैरहजर राहतात हे वास्तव आहे. संबंधित विभागाला शहर स्वच्छतेविषयी सक्त सूचना केल्या आहेत. गैरहजर राहणाऱया 40 कर्मचाऱयांना बडतर्फ केले आहे. कामात हलगर्जीपणा करणाऱयांना दंडात्मक कारवाईही केली आहे. यावेळी परिवहन समिती सभापती राहूल चव्हाण, दिपक गौड, जयवंत हारुगले, रमेश खाडे, धनाजी दळवी, तुकाराम साळोखे, अजित गायकवाड, अनिल पाटील, गजानन भुर्के, अविनाश कामते, पद्माकर कापसे उपस्थित होते.
लवकरच कोंडळामुक्त शहर
 स्वच्छतेसंदर्भात ऍप तयार केले आहे. कचरा उठाव करण्यापूर्वीनंतर असे छायाचित्र टाकण्याच्या सक्त ताकीद दिली आहे. शहरात एकूण 750 कोंडळ आहेत. कचरा उठावसाठी 3 डंपर खरेदी केले आहेत. पाहणीसाठी दोन पथकांची नियुक्ती केली आहे. 104 टिपर मनपामध्ये दाखल होणार असून ते प्रत्येक पाठवून कचरा उठाव करणार आहे. लवकरच कोंडळामुक्त शहर होणार असल्याचे  मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांनी स्पष्ट केले.
नौटंकी सांगू नका : किशोर घाटगे
मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. पाटील चुकीची माहिती देत असल्याचा आरोप करत शिवसेनेचे किशोर घाटगे यांनी त्यांना खडेबोल सुनावले. ते म्हणाले, गणेशोत्सावमध्ये पंचगंगा प्रदूषणासाठी प्रबोधन केले. मूर्ती दानचे आवाहन केले. पंचगंगा नदीमध्ये नवरात्र उत्सवातील मूर्ती नदीकाटावर आल्या आहेत. गणेशोत्साप्रमाणे नियोजन का केले नाही. शहरातील कचऱयाची हीच परिस्थिती आहे. ऍपचा केवळ फार्स आहे. दिखाविगिरी करु नका. येथे नौटंकी सांगू नका, अशा शब्दात घाटगे यांनी डॉ. विजय पाटील यांना सुनावले.

Post a Comment

 
Top