0
सध्या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत असतानाच महामार्गाच्या दुतर्फा ग्रामीण व शहरी भागात बांधकामांसाठी परवानगी कशी असणार? याबाबत नागरिकांच्या मनात अनेक शंका आहेत. मात्र, शहरात इमारत बांधकामासाठी परवानगी देताना सर्व्हिस रोडच्या हद्दीपासून सहा मिटर अंतर सोडून परवानगी देण्यात येणार आहे. शहरातील ज्या इमारती अर्ध्या गेल्या आहेत व पूर्णत: भरपाई मिळाली आहे, त्या इमारती म्हणून गणना होणार नसल्याचे नगर पंचायतीचे मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांनी स्पष्ट केले.
पूर्णत: कर्मशिअल मार्केट असल्यास रस्त्याच्या मध्यापासून 37 मिटरवर बांधकाम करता येणार आहे. तसेच शहरातील महामार्गालगतच्या इमारतींच्या दुरुस्तीचा प्रस्ताव आल्यास त्याबाबत स्ट्रक्चरल ऑडिट करूनच पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. दरम्यान, अनागरी (ग्रामीण) भागात महामार्गाच्या मध्यापासून 40 मिटरच्या बाहेर इमारत बांधकाम करता येणार आहे. हेच बांधकाम पूर्णत: वाणिज्य असल्यास 75 मिटर अंतर सोडावे लागणार आहे.

Post a Comment

 
Top