0
सिडनी - भारत अाणि अाॅस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा अाणि शेवटचा टी-२० सामना अाज रविवारी सिडनीच्या मैदानावर रंगणार अाहे. सलामीच्या विजयाने यजमान अाॅस्ट्रेलिया संघाने या मालिकेत १-० ने अाघाडी घेतली. अाता तिसरा सामना जिंकून मालिका अापल्या नावे करण्याचा यजमानांचा मानस अाहे. दुसरीकडे पहिल्या सामन्यातील पराभवाने टीम इंडियाची नजर अाता मालिका बराेबरीत करण्यावर लागली अाहे. त्यासाठी टीमला अाता सिडनीच्या मैदानावरील सामन्यात विजयाचा विश्वास अाहे. पावसाच्या व्यत्ययामुळे दुसरा सामना रद्द झाला. मात्र, गत सामन्यातील सुमार कामगिरीमुळे भारतीय संघावर पराभवाचे सावट निर्माण झाले अाहे. त्यामुळे टीम इंडिया दीड वर्षानंतर मालिका गमावण्याची शक्यता अाहे. याच्या १८ महिन्यांपूर्वी भारतावर मालिका पराभवाची नामुष्की अाेढवली हाेती. जुलै २०१७ मध्ये विंडीजने भारतावर मालिका विजयाची नाेंद केली हाेती.                                                                                                                 चार वर्षांनंतर स्टार्कला संधी : अाता यमान अाॅस्ट्रेलियाने तिसऱ्या महत्त्वाच्या सामन्यासाठी संघात काहीसा बदल केला. जखमी बिली स्टैनलेकला विश्रांती देण्यात अाली. त्याच्या जागी संघात वेगवान गाेलंदाज मिशेल स्टार्कची निवड करण्यात अाली.यातून स्टार्कला अाता घरच्या मैदानावर तब्बल ४ वर्षानंतर टी-२० सामना खेळण्याची संधी मिळाली. त्याचे साेने करण्याचा त्याचा प्रयत्न असेल.
संभाव्य संघ भारत : विराट काेहली (कर्णधार), राेहित शर्मा, शिखर धवन, लाेकेश राहुल, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, खलील अहमद.
  • India lost the series after a year and a half: today India-Australia matchअाॅस्ट्रेलिया : अॅराेन फिंच (कर्णधार), डी अार्सी शाॅर्ट, क्रिस लीन, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टाेईनिस, बेन मॅक्डरमाॅट, अॅलेक्स कैरी, मिशेल स्टार्क, अँड्र्यू टाय, अॅडम झम्पा, जेसन बेहरनड्राॅफ.                                       

Post a comment

 
Top