0
सध्या जात्यावरती दळण दळणे दुरापस्थ झाले आहे. पण ग्रामीण भागात मात्र हे चित्र अजून कुठेतरीच पाहिला मिळते. दळण दळते जना जात्यावर ज्वारी ‘गाईन गुण मी देवा ये तू माझ्या दारी’ हे गाणं पहाटेच्या वेळी जात्यावर बसून दळण दळत असताना पूर्वी माहिला म्हणायच्या. पण 21 व्या शतकाकडे वाटचाल करताना अनेक जुन्या रुढी, परंपरा व संस्कृतीचा विसर पडला आहे. त्यामुळे जात्यावरील गाणी ही आता काळाच्या पडद्याआड चालली आहेत.
   पूर्वी ग्रामीण भागात जात्यावरील गाणी लोकप्रिय होती. पहाटे चार वाजता उठून महिला जात्यावर दळण दळताना गाणी म्हणत होत्या. त्या काळात वीज, पिठाच्या गिरण्याही नव्हत्या. अशावेळी महिला आपल्या घरातील दळण जात्यावर दळत होत्या. दळण दळताना जात्यावर दोन किंवा तीन माहिला बसून एका वेळी 4 ते 5 पायली धान्य सुमारे दोन ते आडीच तासात दळत असत. त्यामुळे ग्रामीण भागात हे दृश्य काही वेगळे असायचे.
  पहाटेची वेळ घराघरातून निघणारा धुरमध्येच कोंबडय़ाचे आरवणे पहाटेच्या वेळी होणारा आवाज या सर्व गोष्टी म्हणजे ग्रामीण भागातील जीवन वेगळेच वाटते, असे जुन्या पिढीतील लोक सांगतात. तो वगळा काळ वेगळा होता, आता सगळ बदललं बाबा, त्या वेळची जात्यावरील गाणी सुरात, मधूर आवाजात असायची. आजची कसली आलीत गाणी नुसता धांगडधिंगा व नंगानाच आहे. अशी तिखट प्रतिक्रीया जेष्ठ माहिला देतात. जुन्या काळातील गोष्टांनी काही औरच एक रुपया खिशात असला की समदा बाजार पिशवी भरुन येत होता. मात्र, आता एक हजार रुपयात पिशवी सुध्दा भरत नाही. हळुहळू काळ बदलाला इंजनवरील पिठाच्या गिरण्या सुरु झाल्या. गिरणी सुरु आहे हे ओळखता यावे म्हणून इंजिनच्या धुराच्या नळकांडीवर डबा बांधलेला असायचा.
अधुनिक काळात जाती बंद पडलाr
  तसेच त्याचा पूक पूक पूक पूक असा आवाज आला की पिठाची गिरण चालू असल्याचे समजायचे यानंतर गावात इलेक्टीक पिठाच्या गिरण्या झाल्या आणि जाती बंद पडली. आणि जात्यावरील गाणी सुध्दा बंद पडली. 21 व्या शतकाकडे झेपावताना भारतीय सांस्कृतीक कला मागे पडून पाश्चात धुंद संगीत सुरू झाले. त्यामुळेच ग्रामीण भागातील कला आता संपुष्टात आली आहे. परंतु सत्वशीला जाधव या अजूनही आपल्याला जात्यावर दळन दळताना आजही दिसून येतात.

Post a Comment

 
Top