0

दीपावली पाडव्याच्या निमित्ताने गुरुवारी सायंकाळी 6 च्या दरम्यान आयोजित केलेल्या म्हैस पळविण्याच्या शर्यतीला वादंगाचे गालबोट लागले. त्यामध्ये लाल पिवळे ध्वज हाती घेऊन धुडगूस घालणाऱया महाभागांचे कारस्थान उघड झाले. पोलिसांनी जमावाला पिटाळून लावण्यासाठी लाठीमार केला.
दिवाळी पाडव्याला म्हशी पळविण्याचा उत्साह असतो. पारंपरिक पद्धतीने या उत्सवात सारेजण सहभागी होतात. याचेच औचित्य साधून येथील सरदार्स मैदानावर म्हशी पळविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मात्र या स्पर्धेत तालुक्मयातील काही गावांमधील समूह लाल, पिवळा ध्वज घेऊन सहभागी झाले होते. त्याबद्दल काही भगवा ध्वज घेतलेल्या युवकांनी आक्षेप घेतला. त्यानंतर गोंधळाला सुरुवात झाली. काही महाभागांनी दगडफेक केली. त्यामुळे प्रकरण अधिकच चिघळले. त्यानंतर पोलिसांनी युवकांना बदडून काढले. त्यामधून पळापळ सुरू झाल्याने गोंधळ माजला.
म्हैस पळविण्याच्या या शर्यतीमध्ये पारंपरिक स्वरुपात भगव्या ध्वजांचा सहभाग असतो. मात्र यावषी कुरापत काढण्याच्या उद्देशातून काही मंडळींनी लाल पिवळय़ाचा समावेश करण्याचा आटापिटा केला. त्यामधून उद्भवलेल्या वादातून प्रकरण हातघाईवर आले. तसेच पोलिसी बडगा उगारण्यात आला. यामध्ये जखमी झालेल्या युवकांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे

Post a Comment

 
Top