0
नवी दिल्ली: 


रेल्वे स्टेशन, गर्दीच्या ठिकाणी फोन हरवलेल्याच्या घटना बहुतांश घडत असतात.  फोन हरवला म्हटल की श्वास रोखल्यासारख होत. तो पुन्हा मिळवण्यासाठी शोधाशोध, पोलिस ठाण्यात तक्रार अशा अनेक लढतरी कराव्या लागत असतात. पण आता या सर्वाची गरज भासणार नाही. कारण नेहमीच मदत करणारे सर्च इंजिन गुगल मदतीला आले आहे.
हरवलेला  फोन मिळवण्यासाठी गुगलने  Find My Device या सेवेमध्ये एक नवे फिचर ॲड केले आहे. या फिचरद्वारे तुम्ही तुमचा हरवलेला फोन मिळवु शकणार आहात.  फाइंड माय डिव्हासस या सेवेद्वारे 'इंडोर मॅप्स' हे नवे फिचर लाँच केले आहे. युजर्सला निवडक इमारती, मॉल्स, विमानतळ अशा ठिकाणांचे इंडोर व्यू पाहायला मिळणार आहेत. याद्वारे युजर्सला हरवलेला  फोन परत मिळवणे सोप जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार गुगलने या फिचरसंदर्भात काही सविस्तर माहिती अजुनही दिलेली नाही. गुगल प्ले स्टोअरवर हे अप्लिकेशन उपलब्ध करण्यात आले आहे. या ॲपद्वारे हरवलेला फोन शोधण्यास मदत मिळते. ते ॲप जो पर्यंत आपण स्वतःहून शोधण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत लॉक राहते. 
फाइंड माय डिव्हाइस ऍप युजर्सला त्याच्या फोनचे  वर्तमान किंवा अंतिम स्थान आधारावर असलेला नकाशा दाखवते.  Google Maps वर डिव्हाइसेसची देखरेख, सिलेंट मोड किंवा लॉक होईपर्यंत पूर्ण आवाज मध्ये अलर्ट देणे आणि लॉक स्क्रीन पर संपर्क संख्या पाहण्याची सुविधा देते. 

Post a comment

 
Top