0

माण तालुक्यातील चोरटय़ा वाळू उपस्यासाठी प्रसिद्ध असलेल्या वाळू चोर पुढाऱयांनी आता माणगंगा नदी पात्रात सोडण्यात आलेले उरमोडीचे पाणी चोरुन नेहण्याचा ठेका उचलला असून बंधारा व नदीपात्रातील लाखो लिटर पाणी चोरुन नेवून पोलीस, महसूल व म्हसवडकरांना चुना लावण्याचे काम ‘सचिदानंद’ नावाच्या माळशिरस तालुक्यातील वाळू ठेकेदाराने केले आहे.
उरमोडीचे पाणी नदीत असतानाही पात्रा लगतच्या शेतकऱयांना हाताशी धरून रात्रीचा बेसुमार वाळू उपसा 555 च्या स्पिडने करताना दिसत आहे. मात्र, सरकारने पाणी उपस्यावर बंदी घातली असतानाही तो वाळूसम्राट आता पाणी चोर नेण्याचा प्रयत्न करत आहे. म्हसवडमधील बंधारा व नदीतील हजारो लिटर पाणी चोरुन सोलापूरची शेती भिजवून माणगंगा नदी कोरडी करत आहे. याबाबत प्रशासनास कधी जाग येणार?, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. सोलापूर जिह्यातील ‘सचिदानंद’ वाळूसम्राट गेली नऊ ते दहा महिन्यापासून म्हसवडवासीय होऊन म्हसवडमध्येच बस्तान बसविले आहे. म्हसवडपासून एक किलोमीटर अंतरावर एक अलिशान बंगला घेवून माती मिश्रीतच्या नावाने माणगंगा नदीतील लाखो ब्रास वाळू महसूल, पोलीस नाक्यासमोरुन ट्रक भरुन नेहून अधिकारी व बगलबच्च्यांना चिरीमिरीचा नैवेद्य दाखवून तोंडे गप्प करत आहे. वाळू उपसा सुरु असताना हा फकडय़ा ऐवढय़ावरच न थांबता, त्याने फुकटात पाणी चोरण्याचा नवा धंदा सुरु केला आहे.

Post a Comment

 
Top