0
यावल- शहरातील फैजपूर मार्गावरील आदिवासी वस्तीत घराच्या अंगणात खेळत असलेल्या नऊ वर्षीय मुलाला ट्रॅक्टरने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत मुलाचा जागेवरच मृत्यू झाला. शिवलाल बुधा बारेला असे मृत मुलाचे नाव आहे. हरिओम नगरच्या शेजारी माजी नगरसेवक देवराम राणे यांच्या शेताजवळ मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजता ही घटना घडली.
  • मिळालेली माहिती अशी की, फैजपूर मार्गावर आदिवासी पावरा समाजाची छोटीशी वस्ती आहे वस्तीत एक ट्रॅक्‍टर उभे होते. ट्रॅक्‍टरजवळ शिवलालसह वस्तीतील काही मुले खेळत होती. अचानक ट्रॅक्टर पुढे सरकले. ट्रॅक्टरच्या चाकाखाली शिवलाल चिरडला गेला. शिवलाल डोक्यावरून ट्रॅक्टरचे मोठे चाक गेले. घटनेची माहिती मिळताच शिवलाल याला ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनाम्याची कार्यवाही सुरु केली आहे.
    दरम्यान, आपली मुले कुठे खेळतात, याकडे पालकांनी लक्ष द्यावे, असा सूर समोर आला .


Post a comment

 
Top