0
अवनी या नरभक्षक वाघिणीला ठार करण्यात आल्याने त्याचे सर्वत्र पडसाद उमटत आहेत. शिवसेनेनेही अवनीवरून भाजपविरोधत डरकाळी फोडली आहे. ’ज्या राज्यात माणसेही नीट जगू शकत नाहीत त्या राज्यात तुझ्यासारख्या वन्य जीवांचे काय? अवनी, आम्हाला माफ कर.तुला भेकडासारखे मारले. रात्रीच्या अंधरात उंदरांनाही वाघाचे बळ येते’, अशा ’दुष्काळ, उपासमार, कुपोषण, सरकारी अनास्था, शेतकऱयांचे कर्जबाजारीपण यामुळे राज्यात माणसे मरत आहेत, स्वतःचे जीवन संपवून घेत आहेत. मात्र त्यासाठी कोणी सरकारी व्यवस्थेला नरभक्षक ठरवत नाही. वन्य प्राण्यांना मात्र नरभक्षक’ ठरवून त्यांना शिक्षा दिली जाते. अवनी, तू याच मानवी स्वार्थाची बळी ठरलीस’, असा घणाघात उद्ध ठाकरे यांनी केला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक ’सामना’तून उद्धा ठाकरे यांनी हा हल्ला चढवला आहे.

Post a Comment

 
Top