0
किसन वीर कारखाना बंद पडावा, कारखान्याचा हंगामच सुरु होवू नये म्हणून हरेक प्रयत्न करण्यात आले. व्यक्तिगत मला विरोध असेल तर मी समजू शकतो; पण 52 हजार शेतकऱयांच्या मालकीच्या संस्थेबाबत चुकीची भूमिका कधीच खपवून घेणार नाही, असा घणाघात किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी किसनवीरनगर येथे बोलताना केला.
भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या 48 व्या गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे सभासद चंद्रकांत कदम, सुमन कदम, अधिक पाटील, सुचिता पाटील, संजय लाड, विजया लाड, सीताराम शिवणकर, कल्पना शिवणकर, भरत धायगुडे, लिलावती धायगुडे या उभयतांच्या हस्ते गव्हाणीचे विधीवत पूजन करण्यात आले.
याप्रसंगी राज्य मजूर फेडरेशनच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल सतीश भोसले यांचा सत्कार कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर यांच्या हस्ते  करण्यात आला. यावेळी खंडाळा साखर कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, उपाध्यक्ष व्ही. जी. पवार, महालक्ष्मी संस्थेच्या कार्याध्यक्षा डॉ. निलिमा भोसले, माजी शिक्षण सभापती प्रल्हादराव चव्हाण, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम अंबवडय़ाचे प.पू ब्रम्हानंद महाराज, अशोकराव जाधव, नंदकुमार निकम, सचिन साळुंखे, नवनाथ केंजळे, राहुल घाडगे, प्रवीण जगताप, प्रताप यादव-देशमुख, मधुकर शिंदे, सयाजी पिसाळ, चंद्रसेन शिंदे, प्रकाश पवार-पाटील, मधुकर नलवडे, विजय चव्हाण, अरविंद कोरडे, आशा फाळके, अशोकराव जाधव, मोहनराव भोसले, नंदाभाऊ जाधव, रोहिदास पिसाळ, आदींसह शेतकरी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. स्वागत नंदकुमार निकम यांनी, तर प्रवीण जगताप यांनी मानले.

Post a Comment

 
Top