0
येथे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ढोल वादन स्पर्धेत मरगुबाई वालुग ढोल वादक मंडळ अब्दुललाट यांनी प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेस जिल्हय़ातील 22 ढोल वादन मंडळे सहभागी झाली होती.
भगवा चौक परिसर स्पर्धा पाहण्यासाठी गर्दीने फुलून गेला होता. पितळी काळजाचा ठेका चुकतो असे वाटत होते. पितळी गंगाळावर भंडारा शिग लावून त्यावर बंदा रूपया ठेवण्यात येतो. तो रूपया प्रचंड जोरात ढोल वाजवून आवाजाने रूपया वरून तळाला जाऊन सरकत सरकत गंगाळावरून खाली येतो. या प्रक्रियेला सर्वात कमी वेळात रूपया नाणे खाली आणणारे ढोलवादन मंडळ प्रथम क्रमांकाचे मनकरी ठरते. प्रत्येक मंडळाला ढोल वादनाचा क्रम दिला जातो. सर्वांची ढोल वादनाची अचूक वेळ रूपयाचे नाणे तळाला गेल्यानंतर ही वेळ नोंदविली जाते.
स्पर्धेचा निकाल अनुक्रमे असा- मरगुबाई वालुग ढोल वादन मंडळ (अब्दुललाट, ता. हातकणंगले), मंगोबा वालुग ढोल वादन मंडळ (घुणकी, ता. हातकणंगले), धुळसिध्द बिरदेव मंडळ (गडमुडशिंगी, ता. करवीर), महासिध्द वालुग मंडळ (चंदूर, ता. हातकणंगले), माळी गराचा वालुग मंडळ 

Post a Comment

 
Top