0
खेळामध्ये हार जीत ठरलेली असते. पराजयातून यशाचे शिखर गाठता येईल. त्याकरिता खेळाडूंनी खिलाडू वृत्ती अंगीकारुन खेळाचा आनंद घेतला पाहिजे, असे प्रतिपादन औंध शिक्षण मंडळाचे विश्वस्त हणमंतराव शिंदे यांनी केले.
औंध येथील राजा श्रीपतराव महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ अंतर्गत विभागीय क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. श्रीकांत भंडारे, सहसचिव दीपक कर्पे, उपप्राचार्य प्रा. विलास मोरे, क्रीडा संचालक प्रा. सुधाकर कुमकर, यांची प्रमुख उपस्थिती होती.
हणमंतराव शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच दररोज क्रिडांगणावर गेले पाहिजे. त्यामुळे मन प्रसन्न होऊन आनंदी जीवन जगता येईल. व्यक्तीमत्व विकासासाठी प्रत्येकाने खेळाला प्राधान्य दिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. श्रीकांत भंडारे यांनी उपस्थित क्रीडा संचालक, खेळाडू यांचे स्वागत केले. प्रा. सुधाकर कुमकर यांनी आभार मानले.

Post a Comment

 
Top