नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे आज पन्नास भाग पूर्ण झाले. याबद्दल नरेंद्र मोदी यांनी नागरिकांशी आपल्या भावना व्यक्त केल्या. मन की बातमध्ये आवाज फक्त माझा आहे, आणि भावना तुमच्या असल्याचे सांगितले. पन्नास भाग पुर्ण झाल्याबद्दल अनेक गोष्टींना त्यांनी हात घातला. संविधान दिवस, गुरुनानक जयंती याबाबतही ते या कार्यक्रमात बोलले.
मन की बात हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून अनेक लोक हा कार्यक्रम आवडीने ऐकतात. आकाशवाणीकडे लोकांचा पुन्हा ओढा वाढला आहे. हा कार्यक्रम विविध प्रादेशिक भाषेत प्रसारित करणार्या अनेक कर्मचार्यांचे त्यांनी अभिनंदन केले. ते जेव्हा तीस मिनिटे कार्यक्रम सादर करतात तेव्हा त्यांनी मोदी यांची भूमिका साकारलेली असते. यामुळे आकाशवाणीच्या सर्व कर्मचार्यांचे मी मनापासून आभार मानत असल्याचे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिवसाबद्दल माहिती सांगून देशातील तज्ञ लोकांनी संविधान निर्मितीसाठी प्रयत्न केला असल्याचे सांगून संविधानाबद्दल त्यांनी आदर व्यक्त केला.

Post a Comment