0
 • India's World Cup clash against Africa; By seven times a fantastic winning salute!भुवनेश्वर - हाॅकीच्या १४ व्या वर्ल्डकपला अाज बुधवारपासून सुरुवात हाेत अाहे. यजमान भारताचा सलामी सामना दक्षिण अाफ्रिकेशी हाेईल. यासह यजमानांना अाता अापली विजयी सलामीची माेहीम अबाधित ठेवण्याची संधी अाहे. अातापर्यंत भारत अाणि दक्षिण अाफ्रिका यांच्यात विश्वचषकाचे चार सामने झाले. यातील एका लढतीत भारताने विजयाची नाेंद केली, तर तीन सामने बराेबरीत राहिले. त्यामुळे अाता पुन्हा एकदा अाफ्रिकेविरुद्धचे अापले वर्चस्व अबाधित ठेवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. या दाेन्ही संघांतील पहिला सामना १९९४ मध्ये झाला हाेता. घरच्या मैदानावर हाेणाऱ्या या स्पर्धेत अव्वल कामगिरी करण्याचा यजमान भारताचा प्रयत्न असेल. त्यासाठी टीमच्या कामगिरीवर सर्वांची नजर असेल. या स्पर्धेत यंदा १६ संघ सहभागी झाले. हा वर्ल्डकप भारतातील भुवनेश्वर येथे २८ नाेव्हेंबर ते १६ डिसेंबरदरम्यान रंगणार अाहे. अाज पहिल्याच दिवशी दाेन सामने हाेतील. दुसऱ्या सामन्यात बेल्जियम अाणि कॅनडा संघ समाेरासमाेर असतील.

  शेवटचा सामना २०१४ मध्ये; भारत ५-२ ने विजयी 
  भारत अाणि दक्षिण अाफ्रिका यांच्यात अांतरराष्ट्रीय स्पर्धेतील शेवटचा सामना २०१४ मध्ये ग्लास्गाे राष्ट्रकुल स्पर्धेत झाला हाेता. यादरम्यान भारताच्या संघाने ५-२ अशा फरकाने अाफ्रिकेवर मात केली हाेती. तसेच हे दाेन्ही संघ पाच अांतरराष्ट्रीय सामन्यांत समाेरासमाेर अाले. यातील प्रत्येकी दाेन सामने जिंकण्याचा पराक्रम या दाेन्ही संघांनी गाजवला, तर एक लढत बराेबरीत राहिली. तसेच विश्वचषकात या दाेन्ही संघांतील शेवटचा सामना २०१० मध्ये झाला हाेता.
  भारताचा संघ १४ वेळा पात्र; ७ वेळा अातापर्यंत विजयी सलामी 
  अाठ वेळच्या अाॅलिम्पिक चॅम्पियन भारतीय संघ अाता १४ व्यांदा वर्ल्डकपमध्ये अापले काैशल्य पणास लावत अाहे. यातील १३ वर्ल्डकपमध्ये भारताची कामगिरी काैतुकास्पद ठरली. यातील सात वर्ल्डकपच्या सलामीला भारताने शानदार विजयाची नाेंद केली. तर, सलामीच्या चार सामन्यांत भारताला पराभवाला सामाेरे जावे लागले. त्यामुळे अाता विजयी सलामीवर भारतीय संघाची नजर अाहे.
  भारताला तिसऱ्यांदा यजमानपदाचा मान
  भारतामध्ये अाता तिसऱ्यांदा एफअायएचच्या विश्वचषक हाॅकी स्पर्धेचे अायाेजन केले जात अाहे. यापूर्वी भारताने १९८२ अाणि २०१० मध्ये या स्पर्धेचे यजमानपद भूषवले हाेते. अाता याची तिसरी संधी भारताला अाठ वर्षांनंतर मिळाली.
  उद‌्घाटन साेहळ्याला माधुरीच्या नृत्याचे असेल सादरीकरण 
  भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर हाॅकी विश्वचषक स्पर्धेचा उद््घाटन साेहळा रंगणार अाहे. या साेहळ्याला धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षितसह सिनेभिनेता शाहरुख खान, एअार रहमान उपस्थित राहणार अाहेत. हे कलाकार अापल्या कला सादर करतील. संध्याकाळी ५.३० वाजता या साेहळ्याला सुरुवात हाेईल. याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पाेर्ट््स अाणि दूरदर्शनवर हाेणार अाहे.
  वर्ल्ड चॅम्पियन टीमचे कर्णधार अजित पाल यांचा गाैरव
  हाॅकी विश्वचषकाच्या उदघाटन साेहळ्यादरम्यान १९७५ च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचे माजी कर्णधार अजित पाल सिंग यांचा गाैरव करण्यात येईल. त्यांच्या नेतृत्वात भारताने पहिला विश्वचषक पटकावला हाेता. या सत्कार साेहळ्याला अाेडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक अाणि अांतरराष्ट्रीय हाॅकी फेडरेशनचे अध्यक्ष डाॅ. बत्रा यांची खास उपस्थिती असेल.
  - तीन वेळा (७१, ७५,८२) भारताने सर्वाधिक प्रत्येकी ५ सामने जिंकले 
  - शेवटच्या १० वर्ल्डकपपासून भारतीय संघ टाॅप-३ च्या बाहेर 
  - चार वेळा (८६,९०, २००२, ०६) भारताने सर्वाधिक पाच सामने गमावले 
  - भारताने सर्वाधिक २९ गाेल १९८२ च्या विश्वचषकात केले.
  ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनचे खेळाडू भारतीय संघात 
  भारताचा संघ अाता विजयी सलामीसाठी उत्सुक अाहे. यजमान संघामध्ये २०१६ च्या ज्युनियर विश्वचषक विजेत्या टीममधील खेळाडू अाहेत. यात हरमनप्रीत, वरुण कुमार, नीलकांता शर्मा, सुमीत, सिमरनजित सिंगचा समावेश अाहे. याशिवाय १९ वर्षीय दिलप्रीत सिंग अाणि हार्दिक सिंगला संधी देण्यात अाली. संघाच्या अव्वल कामगिरीची मदार कर्णधार मनप्रीत सिंग, अाकाशदीप, वीरेंद्र लाक्रा अाणि गाेलरक्षक पी.अार.श्रीजेशवर असेल. रुपिंदरपालला संघात स्थान मिळाले नाही. एस.व्ही. सुनील दुखापतीने त्रस्त अाहे. यामुळे त्याला एशियन गेम्समध्ये अव्वल कामगिरी करता अाली नाही. त्यामुळे त्याची या विश्वचषकासाठी निवड झाली नाही. ताे संघाच्या बाहेर अाहे.

Post a Comment

 
Top