येथील शेतकऱयांना शुक्रवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा बिबटय़ाचे दर्शन झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गाव परिसरातील बांबर शेतवडीत रताळी काढत असताना अचानक हा प्राणी दिसला. सावधगिरी बाळगून मोबाईलमध्ये त्याचे फोटो काढण्याचा प्रयत्न शेतकऱयांनी केला.
बांबर शेतवडीत देवण, यल्लाप्पा कांबळे आणि इतर शेतकरी रताळी काढत असताना अचानक हा प्राणी त्यांच्या नजरेस पडला.
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी साऊरदळे, मानीचे काऊट गुरवाळ या भागात बिबटय़ाचे दर्शन झाले होते. कुत्रा हे या प्राण्याचे मुख्य भक्ष्य असून त्याच्या शोधार्थ या भागात तो फिरत असावा. वनविभागाने अशा प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

Post a comment