0
भ्रष्टाचार टाळा – देश मजबूत करा, लाच घेणे – देणेही गुन्हा आहे. लाचेची नशा – करते जीवनाची दुर्दशा, कायदेशीर व्यवहार – दूर ठेवी भ्रष्टाचार अशा अनेकविध घोषणांनी भ्रष्टाचार विरुध्द दक्षता जनजागृती रॅलीने बुधवारी शहर दुमदुमुन गेले. या रॅलीत एनसीसी, आरएसपी, आयटीआय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.  महापालिकेच्या अग्निशामन दलाच्या दोन फायर बुलेट या रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरल्या.
         दक्षता जनजागृती सप्ताह 29 ऑक्टोबर ते 3  नोव्हेंबर 2018 या कालावधीत आयोजित करण्यात आला असून या सप्ताहानिमित्त लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने आज काढण्यात आलेल्या भ्रष्टाचार विरुध्द दक्षता जनजागृती रॅलीचा शुभारंभ अतिरिक्त् पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. भवानी मंडपापासून सुरू झालेल्या या रॅर्लीच्या शुभारंभ कार्यक्रमास अन्टी करप्शन ब्युरोचे प्रमुख पोलीस उपअधीक्षक गिरीष गोडे, पालीस निरीक्षक मारूती पाटील यांच्यासह अन्टी करप्शन ब्युरोमधील कर्मचारी तसेच अनेक मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते.         
         रॅलीतील विद्यार्थ्यांनी लाच देणे व लाच घेणे हा गुन्हा आहे, भ्रष्टाचार टाळा देश मजबुत करा, भ्रष्टाचार निर्मुलनाचा विचार करे लोकशाही साकार व लाचेची माया टाकते कुटुंबावर दुर्दशेची छाया इत्यादी घोषणा देवून भ्रष्टाचार विरुध्द  जनजागृती करण्यात आली. ऍन्टी करप्शन ब्युरीकडे कार्यान्वित असलेला टोल फ्री क्रमांक 1064 चा उल्लेख असलेले भ्रष्टाचारा विरुध्दचे पोस्टर्स प्रदर्शित करुन भ्रष्टाचार विरुध्दच्या तक्रारी देण्याबाबत आवाहन करण्यात आले.

Post a Comment

 
Top