0
मुंबई, 22 नोव्हेंबर 'जो पर्यंत सरकार मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा अहवाल सभागृहात ठेवत नाही, तोपर्यंत कामकाज होऊ देणार नाही' अशी आक्रमक भूमिका विरोधकांनी घेतली. त्यामुळे 10 मिनिटांसाठी सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. 
सरकारमधील मंत्र्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे जनतेमध्ये आरक्षणाबाबत संभ्रम तयार झाला आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला. 
मराठा आरक्षणाबाबत सरकारनं अहवाल स्वीकारलाय की नाही हे स्पष्ट करावं, अशी मागणी विरोधकांनी केली.त्यावर मुख्यमंत्र्यांनी सभागृहात स्पष्टीकरण दिलं आहे.'आम्ही मागासवर्ग आयोगाच्या सर्व शिफारशी स्वीकारल्या, म्हणजेच अहवाल स्वीकारला,' असं मुख्यमंत्री म्हणाले.
शेलारांचे अजित पवारांवर टीकास्त्र
सभागृहात विरोधकांकडून आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोंधळ घालण्यात आल्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी अजित पवारांवर टीका केली. 'अजित पवार यांनी भूमिका का बदलली, आधी म्हणाले अहवाल मांडू नका, आता म्हणतात अहवाल मांडा,' असं म्हणत शेलारांनी अजित पवारांना लक्ष्य केलं.मराठा आणि धनगर आरक्षणावरून विरोधक आक्रमक, कामकाज तहकूब

Post a Comment

 
Top