0
सीमाभागातील मराठी भाषिक बांधव 1956 पासून कर्नाटक सरकारच्या जुलुमशाहीविरोधात लढत आहेत. त्यांच्या सहनशिलतेला आपण सलाम करतो. सीमावासीयांवर अन्याय झाल्यास तत्काळ त्यांच्या पाठिशी ठाम राहण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे सीमावासीयांच्या पाठिशी शिवसेना ठामपणे उभी आहे, अशी ग्वाही महाराष्ट्रातील आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिली.
निपाणीत गुरुवारी काळादिन कडकडीत पाळण्यात आला. यानिमित्त येथील धर्मवीर संभाजीराजे चौकात आयोजित केलेल्या मानवी साखळीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सकाळी 11 च्या सुमारास संजय पवार यांच्यासह शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, संजय जाधव यांचे संभाजीराजे चौकात आगमन झाले. यावेळी मराठी भाषिकांनी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, निपाणी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यानंतर मानवी साखळी करण्यात आली. यावेळी अर्ध्या तासासाठी वाहतूक ठप्प झाली होती. सीमाभाग हा महाराष्ट्राचा भाग आहे. हे मराठी भाषिकांनी निवडणुकीच्या माध्यमातून वेळोवेळी दाखवून दिले आहे. त्यामुळे न्यायालयीन लढाईतही मराठी भाषिकांचा विजय होणार असल्याचा विश्वास संजय पवार यांनी व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे जयराम मिरजकर, प्रा. डॉ. अच्युत माने, जिल्हा शिवसेनाप्रमुख बाबासाहेब खांबे, गणी पटेल, नगरसेवक जयवंत भाटले, राजू गुंदेशा, संतोष सांगावकर, विनायक वडे, सुनील शेलार, सचिन गारवे, श्रीमंत दादाराजे निपाणकर सरकार, हरीष तारळे, प्रा. भारत पाटील, बी. टी. तराळ, संदीप खोत-मांगूर, उदय शिंदे, विठ्ठल वाघमोडे, गणू गोसावी, विनोद बागडी यांच्यासह पदाधिकारी, मराठी भाषिक कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित हो

Post a Comment

 
Top