लखनऊ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील शहरांची नावे बदलण्याचा सपाटा लावला आहे. अलाहाबादचे प्रयागराज आणि फैजाबादचे अयोध्या असे नामांतर करत वेगळ्या प्रकारचा संदेश दिला आहे. त्यापाठोपाठ आता जगप्रसिद्ध आगऱ्याचे नाव बदलण्याची मागणी योगींकडे स्थानिक भाजप नेत्यांनी केली आहे. आगऱ्याचे अग्रवन असे नामांतर करण्याच्या मागणीसाठी स्थानिक भाजप नेत्यांनी योगींना पत्र लिहिले आहे.
भाजपचे आमदार जगन प्रसाद गर्ग यांनी योगींना पत्र लिहून आग्रा शहराचे नाव बदलून अग्रवन किंवा अग्रवाल करण्याची मागणी केली आहे. गर्ग यांनी म्हटले की, आग्रा या नावाचा काहीही अर्थ नाही. तुम्ही कुठेही चेक करा याचा काहीही संबंध आढळत नाही. पूर्वीच्या काळी याठिकाणी प्रचंड जंगले होती. अग्रवाल समाजाचे लोक या जंगलांमध्ये राहायचे. त्यामुळे या शहराचे नाव अग्रवन किंवा अग्रवाल असायला हवे असे त्यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटले आहे. गर्ग हे आग्रा उत्तर मतदारसंघाचे आमदार आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a comment