0
येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रात्रीच्या वेळी मोटरसायकलस्वारांना आणि दाम्पताना सशस्त्राचा धाक दाखवून लुटमारी करणार्या तिघांच्या टोळीला अटक केली. त्याच्याकडून सोन्याचे दागिणे, मोबाईल हॅन्डसेटसह 40 हजारांची रोकड असा 1 लाख 51 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या टोळीचा म्होरक्या हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, यामध्ये एका महाविद्यालयीन युवकाचा समावेश आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत माहिती दिली. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत उपस्थित होते. 
पोलीस अधीक्षक डॉ.देशमुख म्हणाले, गेल्या महिन्यात गगनबावडा, पन्हाळा आणि जोतिबा रोडवर रात्रीच्यावेळी मोटरसायकलस्वार व दाम्पत्याना सशस्त्राचा धाक दाखवून लुटण्यात आले होते. जोतिबा रोडवर शिंदे दाम्पत्याची मोटरसायकल अडवून, त्याना लुटत असताना चोरटे गोप्या, गोटय़ा, जॉन्टय़ा अशा नावाने एकमेकाशी बोलत होते. याची आणि त्याचा वर्णनाची शिंदे दाम्पत्यांनी दिलेल्या माहितीवरुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस लुटमार करणार्या चोरटय़ांचा शोध सुरु केला.
याचदरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सचिन पंडीत, सहाय्यक फौजदार विजय कोळी, कॉन्स्टेबल इकबाल महात, संतोष माने, अमोल कोळेकर, कृष्णात पिंगळे, राजेंद्र हांडे, जितेंद्र भोसले, रविंद्र कांबळे आदीच्या पथकाला रेकार्डवरील गुन्हेगार गोपी उर्फ योगेश राजेश गागडे (वय 22, रा. कंजारभाट वसाहत, शिंगणापूर), जॉन्टय़ा उर्फ जॉन्टी उर्फ सोहेल राजू मांगलेकर (वय 22, रा. संकपाळनगर, कसबा बावडा), रियाज नबी तांबोळी (वय 19, रा. गणेशनगर, शिंगणापूर) या तिघांना शिंगणापूर (ता.करवीर) रोडवरील म्हसोबा मंदीराशेजारी एका मोटरसायकलवरुन जाताना संशयावरुन पकडले. त्यावेळी त्याच्याकडे प्रत्येकी दोन मोबाईल हॅन्डसेट मिळून आले. यावरुन या तिघांना पोलीस ठाण्यात आणून कसून चौकशी सुरु केली. त्यावेळी या तिघांना गगनबावडा, पन्हाळा, जोतिबा रोडवर रात्री वेळी गेल्या महिन्या मोटरसायकलस्वार आणि दाम्पत्याना अडवून, त्यांना सशस्त्राचा धाक दाखवून लुटमारी केल्याची कबूली दिली. त्यावरुन पोलिसांनी त्याच्याकडून 45 हजारांचे सोन्याचे दागिणे, 66 हजार रुपये किंमतीचे महागडे मोबाईल हॅन्डसेट आणि 40 हजारांची रोकड असा

Post a Comment

 
Top