सरकारने पणन कायद्यात बदल करणारा अध्यादेश काढल्यामुळे राज्यभरातल्या बाजार समित्यांनी बेमुदत बंद पुकारला आहे. काल राज्यातल्या काही बाजार समित्या माथाडी कामगारांनी बंद ठेवल्यानंतर आज माथाडी कामगार आणि व्यापाऱयांकडून राज्यभर बंद पुकारण्यात आला. त्यामुळे सरकारने बाजार समिती विधेयक मागे घेतले आहे. माथाडी कामगारांच्या बंदला हे यश मिळाले आहे.
विधानपरिषदेत काल “महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती विकास व विनिमय क्रमांक 64” हे विधेयक मंजूर करण्यात आले होते. त्यामुळे आज माथाडी कामगारांनी राज्यव्यापी बंद पुकारला आणि माथाडी कामगारांनी राज्य सरकारला निवेदन दिले. त्यानंतर सरकारने हे विधेयक तात्पुरते मागे घेऊन अभ्यास करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच याबाबत समिती गठित करुन व्यापारी, माथाडी, शेतकरी यांना अडचण येणार नाही, असा नवीन कायदा करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. माथाडी कायद्यात सुधारणा करण्याच्या नावाखाली माथाडी कायदा नष्ट करण्याचा राज्य सरकारकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप माथाडी कामगार आणि व्यापाऱयांनी केला होता.
पणन सुधारणांना विरोध का
– बाजार समितीचे कार्यक्षेत्र मर्यादीत केले गेले.
– बाजार आवाराबाहेर शेतमाल व्यवहार नियमनमुक्त केला, मात्र बाजार आवारात नियमनमुक्त नाही, याला व्यापारी वर्गाचा आक्षेप आहे. आवारातल्या आणि आवाराबाहेरील व्यापारात तफावत नसावी असे व्यापारांचे मत आहे

Post a Comment