0
नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणावर कोसळल्याने भारतात प्रेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये लक्षणीय घट झाली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ कमकुवत होण्याची भीती आणि खनिज तेलाच्या पुरवठ्यात वाढ होण्याच्या शक्यतेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती घटत आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीत होत असलेल्या घसरणीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेलाही मोठा दिलासा मिळाला असून,  रुपयाचे मूल्यही हळुहळू सावरत आहे.  त्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये  मोठ्या प्रमाणावर घट होऊ शकते. 

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला कच्च्या तेलाच्या किमती 86 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्या होत्या. त्यामुळे भारतात पेट्रोलच्या किमती लवकरच शंभरी गाठणार अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र आंतराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या किमती अचानक कोसळल्याने भारतातही पेट्रोल, डिझेलचे भाव घटले आहेत.  त्याचा चांगला परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरही दिसून येत आहे. तसेच त्यामुळे रुपयाचे मूल्यही वधारले आहे. गेल्या काही दिवसांत डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 2.79 टक्क्यांनी वधारले आहे. मंगळवारी बाजारामध्ये एका डॉलरसाठी 71.46 रुपये मोजावे लागत होते. 

   पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये मोठा भडका उडाल्यानंतर 17 ऑक्टोबरपासून पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होण्यास सुरुवात झाली होता. तेव्हापासून पेट्रोल 6.45 रुपयांनी आणि डिझेल 4.42 रुपयांनी स्वस्त झाले आहे.  

Good news! Petrol and diesel prices can reduce | खूशखबर! अजून घटू शकतात पेट्रोल, डिझेलचे भाव 

Post a Comment

 
Top