0
 जळगाव :शहरात सुरू असलेल्या सैन्य भरती दरम्यान स्वच्छ भारत अभियान धाब्यावर ठेवल्याचे चित्र असून प्रशासनातर्फे कोणतीही व्यवस्था न केल्याने शिवतीर्थ मैदानावर उघड्यावर शौचाला जावे लागण्याची वेळ उमेदवारांवर आली आहे.
सैन्य भरतीसाठी शहरात मोठ्या प्रमाणात उमेदवार येणार असल्याचा अंदाज असणे स्वाभिवाक आहे, मात्र असे असताना सैन्य भरतीच्या पार्श्वभूमीवर शहरात कोठेही फिरते शौचालयाची सुविधा जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन असो की मनपाच्यावतीने करण्यात आलेली नाही. त्यामुळे आलेले उमेदवार शिवतीर्थ मैदानावरच प्रांतविधीसाठी जात असून त्यामुळे या परिसरात सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. या ठिकाणची स्वच्छता कोण करणार असा सवालही उपस्थित केला जात आहे.
कोणतीही भरती करताना त्या दरम्यान किमान पिण्याच्या पाण्याची व प्रांतविधीची सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित असते. मात्र या भरती दरम्यान या कोणत्याही सुविधा न दिल्याने उमेदवार त्रस्त झाले आहेत.
शिवतीर्थ मैदान परिसरात दुर्गंधी पसरली असून येणाऱ्या जाणाºया नागरिकांसह या परिसरातील विक्रेत्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
स्वच्छ भारत अभियानला हरताळ
देशात उघड्यावर कोणी शौचास जावू नये म्हणून मोठा गाजावाजा करीत स्वच्छ भारत अभियान राबिविले जात आहे. मात्र शासकीय यंत्रणेमार्फतच राबविल्या जाणाºया या सैन्य भरतीमध्ये स्वच्छ भारत अभियानाला हरताळ फासले जात आहे.
During the army recruitment in Jalgaon, 'Swachh Bharat Abhiyan' on the Dhanbha | जळगावात सैन्य भरतीदरम्यान ‘स्वच्छ भारत अभियान’ धाब्यावर

Post a comment

 
Top