0
  • kolhapur shiroli sarpanch fired straight up into the air on laxmipoojanकोल्हापूर- शिरोलीचे लोकनियुक्त सरपंच शशिकांत खवरे यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. लक्ष्मीपूजनानंतर खवरे यांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप आहे. खवरे गोळीबार करतानाचा व्हिडीओ व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला आहे.

    मिळालेली माहिती अशी की, काल बुधवारी लक्ष्मीपूजनानंतर संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास शशिकांत खवरे यांनी कार्यकर्त्यांसह भररस्त्यावर डबलबार बंदूक आणि पिस्तुलमधून हवेत गोळीबार केला. सरपंच यांनी केलेल्या कृत्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. भारतीय शस्त्र अधिनियम 1959 च्या कलम 30 प्रमाणे खवरे यांच्याविरोधत गुन्हा दाखल झाला आहे.
    शशिकांत खवरे हे लोकनियुक्त सरपंच आहेत. उत्साहाच्या भरात खवरे यांनी हवेत गोळीबार केल्याचा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. खवरे यांच्याकडे शस्त्र परवाना असल्याचेही कार्यकर्त्यांनी सांगितले.

Post a Comment

 
Top