- / मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यामुळे महाराष्ट्रासह देशभरात चैतन्याची लाट उसळली आहे. मात्र अखिल भारतीय आखाडा परिषदेने शिवसेनेचे आमंत्रण धुडकावले आहे. एवढेच नाही तर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर गंभीर आरोपही केले आहेत.
शिवसेनेने राजकीय खेळी केल्याचा गंभीर आरोप आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी केला आहे. आखाड्याशी संबंधित साधू-संत शिवसेनेच्या नाही तर 25 नोव्हेंबर रोजी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमातही सहभागी होणार नाहीत,असेही महंत नरेंद्र गिरी यांनी स्पष्ट केले आहे.दुसरीकडे, अयोध्येत लक्ष्मण किला भागात शिवसेनेच्या भूमीपूजनाला सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे नेते यावेळी उपस्थित आहेत.काय म्हणाले महंत नरेंद्र गिरी..?शिवसेना आणि विश्व हिंदू परिषदेला रामापेक्षा राजकारणात अधिक रस आहे. या दोन्ही संघटना केवळ प्रचार करण्यासाठी आणि राजकारणासाठी अयोध्यात कार्यक्रम करत आहेत. असा घणाघाती आरोप नरेंद्र गिरी यांनी केला आहे. हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदुत्वादी पक्षांचा मंदिर बनवणे हाच हेतू असेल, तर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन का? असा सवालही महंत नरेंद्र गिरी यांनी केला आहे. शिवसेना आणि विहिंपच्या कार्यक्रमांमुळे मंदिर बांधण्यासंदर्भात कोणताही तोडगा निघणार नाही, असेही महंत नरेंद्र गिरी यांनी म्हटले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment