0
दोन महिन्यांपासून ठेकेदाराकडून पगार देण्यास टाळाटाळ होत असल्याने प्रादेशिक मनोरूग्णालयातील कंत्राटी सफाई कर्मचाऱयांनी मंगळवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आह़े एकूण 24 सफाई कर्मचारी मनोरूग्णालयात काम करत आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे रूग्णांच्या सोईसुविधांवर त्याचा प्रभाव पडला आह़े
प्रादेशिक मनोरूग्णालयातील सफाई कर्मचाऱयांचा ठेका हा ड़ी एम एन्टरप्रायझेस कंपनीकडे आह़े दोन वर्षापासून ही कंपनी रूग्णालयातील साफसफाईसाठी सेवा देत आहे. त्यासाठी 24 कर्मचाऱयांची नेमणूक करण्यात आली आह़े मात्र गेल्या दोन महिन्यांपासून या कर्मचाऱयांचे वेतन ठेकेदार कंपनीकडून देण्यात आलेले नाह़ी वेळोवळी ही बाब रूग्णालय प्रशासनाच्या निदर्शनास आणून देखील यासंबंधी उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने अखेर या कर्मचाऱयांनी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसल़े
ठेकेदाराकडून केवळ 205 रूपये वेतन कर्मचाऱयांना दिले जात़े मात्र कामाचे आठ तास ठरलेले असतानाही 12 तास काम करून घेतले जात़े कोणत्याही कर्मचाऱयाला वेळेवर पगार दिला जात नसून दोन वर्षापासून पगारवाढीचे केवळ आश्वासन दिले जात आहे. आम्हाला शासनाकडून किती वेतन मिळते तसेच त्यामधून किती प्रमाणात भविष्य निर्वाह निधी कापला जातो यासंबंधी माहिती कर्मचाऱयांना दिली जात नाह़ी

Post a Comment

 
Top