0
  • Uddhav Thackeray PC from Ayodhya liveअयोध्या - रामल्लाचे सहकुटुंब दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी रविवारी पत्रकार परिषदेत हिंदीतून संवाद साधला. हा अयोध्या दौरा हा फक्त राम मंदिरासाठी आहे. यात माझा कुठल्याही प्रकारचा छुपा एजंडा नाही. मी समस्त हिंदूंच्या भावना घेऊन येथे पोहोचलो असे ठाकरेंनी स्पष्ट केले. सोबतच त्यांनी केंद्र सरकारला राम मंदिराच्या मुद्द्यावर चांगलेच खडसावले. सरकारने राम मंदिरावरून हिंदूंच्या भावनेशी खेळू नये अन्यथा हे सरकारच राहणार नाही असा इशारा उद्धव यांनी दिला आहे.
    अध्यादेश काढा, कायदा करा, काहीही करून बांधकाम सुरू करा...
    - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला राम मंदिरावरून घेरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सरकारला स्पष्ट शब्दात इशारा दिला की अध्यादेश काढा किंवा काहीही करा पण राम मंदिराची लवकरात लवकर निर्मिती करा असे ते म्हणाले आहेत.
    - कोर्टात राम मंदिराचा मुद्दा असेल तर सरकारने यासंदर्भात आश्वासने दिलीच कशाला. निवडणुकीत प्रचार सुरू असताना सर्वच शक्यता पडताळून पाहिली जाणार असे आश्वस्त केले होते. परंतु, 4 वर्षे उलटल्यानंतरही सरकारला पर्याय सापडला नाही का असा सवाल त्यांनी केला.
    - अयोध्या दौऱ्यामागे माझा कुठलाही छुपा एजंडा नाही. मी अयोध्येत फक्त राज्य किंवा देशातील नव्हे, तर जगभरातील करोडो हिंदू बांधवांच्या भावना घेऊन येथे पोहोचलो.
    - निवडणुका लागताच सगळे राम-राम करत असतात आणि एकदा निवडून आले की मग आराम सुरू असतो. सरकारने हिंदूंच्या भावनांशी खेळ करू नये अन्यथा हे सरकारच राहणार नाही असे ठाकरेंनी ठणकावले आहे.

Post a Comment

 
Top