0
  • Due to the dusk, there was a crowd to showcase Tulajbhavaniतुळजापूर- दीपावली सुटीच्या पार्श्वभूमीवर तुळजाई नगरी भाविकांनी गजबजली आहे. दर्शन मंडप दिवसभर फुल्ल आहे तर पेड दर्शनाला गर्दी आहे. दरम्यान, अतिक्रमण आणि बेशिस्त पार्किंगमुळे भाविकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने भाविकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.


    सलगच्या दीपावली सुटीत पर्यटनाला देवदर्शनाची जोड देत मोठ्या संख्येने चाकरमानी बाहेर पडल्याने शुक्रवारी (दि.९)तसेच शनिवारी (दि.१०) तुळजाई नगरी भाविकांनी गजबजून गेली आहे. शहरातील सर्वच रस्ते भाविकांनी ओसंडून वाहत आहेत. त्याच वेळी दर्शन मंडप भाविकांनी खचाखच भरलेला आहे. मोठ्या संख्येने असलेले चाकरमानी सशुल्क दर्शनाला प्राधान्य देत असल्याने मंदिर संस्थानच्या उत्पन्नात भर पडत आहे. पुढील काही दिवस भाविकांची गर्दी कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
    अरुंद रस्त्यांमुळे सर्वत्र होते वाहतूक कोंडी
    संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातून कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना तुळजाई नगरीत सर्वत्र वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुळातच अरुंद असलेल्या शहरातील रस्त्यांवर अतिक्रमण आणि बेशिस्त पार्किंगमुळे शहरात सर्वत्र सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. तासन‌्तास वाहतूक कोंडीत अडकलेल्या भाविकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
    महामार्गावर वाहनांच्या रांगा, पालिकेसह पोलिसांचे दुर्लक्ष 
    तीर्थक्षेत्र तुळजापुरातून जाणाऱ्या महामार्गावर वाहनांच्या रांगा लागणे नित्याचेच झाले आहे. अतिक्रमण हटवण्याकडे पालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. तर वाहतूक पोलिस शहराबाहेर महामार्गावर चिरीमिरी वसूल करण्यात धन्यता मानत असल्याने शहरातील वाहतूक विस्कळीत होत आहे. याचा फटका आपत्कालीन परिस्थितीत शहरातील अाबालवृद्धांना बसत आहे.
    तुळजापूर-दिवाळी सुट्यांमुळे शनिवारी तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वारासमोर भाविकांची मोठी गर्दी झाली होती. तसेच वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी झाली.

Post a Comment

 
Top