0
    • क्वालालंपूर - मलेशियाचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. त्यात डॉक्टर एका मुलाच्या नाकातून प्लास्टीकचा एक लहानसा तुकडा काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. एका खेळण्याचा हा तुकडा मुलाच्या उजव्या नाकपुडीत गेला. त्यामुळे त्या मुलाला प्रचंड त्रास होत होता. त्यानंतर डॉक्टरांनी बराचवेळ प्रयत्न केल्यानंतर हा तुकडा नाकातून काढला. डॉक्टरांनी कॅमेऱ्याच्या मदतीने हा तुकडा काढण्याचा व्हिडिओदेखिल तयार केला. हाच व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होता आहे.

      मलेशियाची राजधानी क्वालालंपूरमध्ये असलेले तज्ज्ञ डॉक्टर रहमत उमर (49) यांनी या नवजात बाळाच्या नाकातून हा खेळण्याचा तुकडा काढला आहे. त्यांनीच त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

Post a Comment

 
Top