0
महाराष्ट्रातील काश्मीर असे महाबळेश्वरचे वर्णन केले जाते. सातारा जिह्यात महाबळेश्वर सह्याद्रीच्या कुशीत वसले आहे. निसर्गरम्य व थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वरचा लौकिक आहे. महाबळेश्वर इंग्रजांच्या काळात मुंबई प्रांताची उन्हाळ्यातील राजधानी होती. या वर्षात विविध पॉईंटवर घडलेल्या आत्महत्यांच्या घटनांमुळे निसर्गरम्य स्थळाला आत्महत्यांच्या घटनांचे गालबोट लागत असून आता पोलिसांनी याबाबत हॉटेल व्यावसायिकांना धारेवर धरल्याने त्यांनीही धास्ती घेतली  असून पर्यटकांची नोंद ठेवण्यास आरंभ केला आहे. 
मिनी काश्मिर म्हणून थंड हवेच्या महाबळेश्वरला देशासह परदेशातील पर्यटक पसंती देतात. महाबळेश्वर हे पर्यटनासाठी निसर्गरम्य आणि शांत ठिकाण आहे. या परिसरात फारशा सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱया घटना घडत नाही. मात्र, पावसाळय़ात नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागते. घाटातील दरडी कोसळणे व त्यामुळे वाहतूक ठप्प होणे अशा प्रकारांना प्रशासनाला तोंड द्यावे लागते. आंबेनळी घाटात मध्यंतरी घडलेल्या मोठय़ा अपघाताने हा घाट चर्चेत आला. कृषी विद्यापीठाच्या सहलीतील पर्यटकांना यात जीव गमवावा लागला. यावेळी प्रशासनासह पोलीस, ट्रेकर्स व नागरिकांनी प्रचंड मदत करत यातील मृतदेह दरीतून बाहेर काढले.
महाबळेश्वर परिसरातील घाटरस्त्यावर संरक्षक कठडे, दर्जेदार रस्ता ठेवणे या बाबी आवश्यक असून अपघात झाली की थेट दरीत उतरुन मदत करण्यासाठी अद्यावत मदत यंत्रणा सुसज्ज ठेवण्याची गरज आहे. येथे सुमारे 30 ठिकाणे बघण्यासारखी आहेत. एलफिस्टन पॉईट, विल्सन पॉईंट, आर्थर पाईंट, लॉडनिंग पॉईंट, माजोरी पॉईंट नाथकोट, बॉंम्बे पाईंट, सावित्री पाईंट कर्निक पाईंट फाकलेड पॉईंट हे काही पॉईंट प्रसिद्ध आहेत.
या पॉईंटवर जाऊन सूर्यास्त पाहण्याची मजा काही वेगळीच. महाबळेश्वरचे पठार जवळपास 150 किलोमीटरमध्ये व्यापले आहे. समुद्रसपाटीपासून ते 4710 फुट उंचीवर आहे. याच पॉईंटसवर आत्महत्या करण्याच्या घटना गेल्या महिन्यात वाढल्या असून त्यामुळे महाबळेश्वर चर्चेत आले आहे. निसर्गरम्य स्थळी आंनद घेण्यापेक्षा आत्महत्येसाठी हे पाँईटस गंभीर ठरु लागले आहेत. प्रेमी युगलाने केलेल्या आत्महत्येनंतर आता महाबळेश्वर पोलिसांनी हॉटेल व्यावसाईकांना चांगलंच धारेवर धरलंय. प्रेमी युगलांची माहिती हॉटेल व्यावसायिकाने व्यवस्थित न ठेवल्यामुळे हॉटेल मालकावर गुन्हा दखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे महाबळेश्वरमधील हॉटेल व्यावसाईकांचे धाबे दणाणले आहेत.

पर्यटकांची कागदपत्रे पाहूनच बुकींग द्यावे
महाबळेश्वरमध्ये येणाऱया पर्यटकांची व्यवस्थित नोंद ठेवणे आता या घटनांमुळे हॉटेल व्यावसायिकांना बंधनकारक झाले आहे. पर्यटनस्थळी पती, पत्नी म्हणून नोंद करुन राहणाऱया युगलांना आता यामुळे चाप बसणार आहे. आत्महत्येमधील घटनांमध्ये प्रेमी युगलांच्या आत्महत्या असल्याने त्या रोखण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांना पर्यटकांची कागदपत्रे पाहूनच बुकींग द्यावे लागणार आहे.

Post a Comment

 
Top