नगर - अहमदनगर महापालिका निवडणुकीत प्रथमच सर्व ६८ जागांवर उमदेवार देणाऱ्या भाजपच्या चाैघांचे अर्ज छाननीत अवैध ठरले. महापौरपदाचे प्रमुख दावेदार असलेले खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र व सून दीप्ती यांचा त्यात समावेश आहे. गांधी यांच्या ‘देवेंद्र’ बंगल्याचे काही बांधकाम रस्त्यावर असल्याची तक्रार ग्राह्य धरत ही कार्यवाही करण्यात आली.
भाजपचे प्रदीप परदेशी, सुरेश खरपुडे, शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे, राष्ट्रवादीचे डॉ. योगेश चिपाडे यांच्यासह ११ जणांचे अर्जही अवैध ठरले.
गांधींच्या अर्जावर शिवसेनेचे गिरीश जाधव यांनी हरकत घेतली होती. सुवेंद्र व दीप्ती यांनी अर्जात ज्या घराचा पत्ता दिला, त्या घराचा काही भाग रस्त्यावर अाहे, अशी जाधव, संभाजी कदम यांची हरकत होती. त्यावर सुनावणी घेत निवडणूक निर्णय अधिकारी शाहुराज मोरे यांनी शुक्रवारी पहाटे अडीच वाजता सुवेंद्र व दीप्ती यांचा अर्ज अवैध ठरवला. दरम्यान, ही निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठित केली असून याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment