0
कणकवली - कृषी पंपांची जोडणी, जुने वीज खांब व वीज तारा बदलणे, गावागावात होणाऱ्या कमी दाबाच्या वीज पुरवठ्याची समस्या सोडविणे आदींसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाने 5 हजार कोटींची गुंतवणूक केली. त्यामुळे कालावधीत वीज पुरवठ्यातील बहुतांश समस्या मार्गी लागतील, असा विश्‍वास कंपनीचे संचालक विश्‍वास पाठक यांनी येथे व्यक्‍त केला. 
महावितरणची रिक्‍तपदे लवकरच भरणार 
महापारेषण, महावितरण व महानिर्मितीचे विद्युत जाळे सक्षम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. शेतीला दिवसा सलग आठ तास वीज मिळावी यासाठी उपकेंद्र सौरऊर्जा निर्मिती व स्वतंत्र वाहिनीचे काम करण्यात येत आहे. महावितरणची रिक्‍तपदे लवकरच भरणार आहोत. मागील चार वर्षात साडे चार लाख कृषी पंप जोडणी दिली अशीही माहिती पाठक यांनी दिली. 
विजेची मागणी व पुरवठ्याचे गणित जुळवून आम्ही महाराष्ट्र राज्य भारनियमनमुक्त केले आहे. राज्याची विजेची मागणी 18 हजार मेगावॅटवरुन 25 हजार मेगावॅटपर्यंत पोचली. तरीही 24 तास सुरळीत व स्वस्तात वीजपुरवठा करण्यात यशस्वी ठरलो आहोत.'

Post a comment

 
Top