0
वाई व जावली तालुक्यातील धोम धरणाच्या उजव्या कॅनॉलला खेकडय़ांनी व निकृष्ट अशा सिंमेटच्या पातळ थराला पोखरल्याने अनेक ठिकाणी भगदाड पडून पॅनॉलची अवस्था दयनीय झाली आहे. बावधन (ता. वाई) पासून ते जावलीच्या भिवंडीपर्यंत 50 ते 70 ठिकाणी मोठय़ा प्रमाणात कालव्याचे बांधकाम ढासळले असून दोन्ही तालुक्यातील कालवे शेवटची घटका मोजत आहेत.
धोम-पाटबंधारे कालव्याच्या दुरुस्तीबाबत दुर्लक्ष होत असल्याने संतापाची लाट उसळली आहे. धोम धरणाच्या बांधकामानंतर एकदाही दुरुस्ती झाली नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वाई व जावली तालुक्यातील उजवा कालव्याचे जाळे मोठय़ा प्रमाणात असल्याने त्यामुळे 70 टक्के जमीन ओलीताखाली येऊन बागायती क्षेत्रात वाढ होऊन ऊस, हळद, आले व काही इतरही व्यापारी पिके घेण्यावर शेतकऱयांचा भर असतो. 15 दिवसांतून आळी पाळीने पाणी सोडण्याची पध्दत आहे. कालव्यात पाणी सोडल्यानंतर खेकडय़ाच्या मेहेरबानीमुळे व इतर पॅनॉलमध्ये पडलेल्या वस्तुमुळे मोठय़ा प्रमाणात गळती लागली आहे. त्यामुळे शेतीला पाणी कमी पण ओढय़ा  नाल्यांमध्ये पाणी जास्त वाहून जावून लाखो लिटर पाणी वाया जाते. धोम पाटबंधारे खात्याच्या पाटकऱयांमुळे संबंधित खात्याला अंधारात ठेवून परस्पर मेहेरबानी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खेकडय़ांच्या संक्रांतीबरोबर खात्यांतर्गत होणारी गळती रोखणे मोठे आव्हान आहे. शेतकऱयांच्या माध्यमातून गोळा होणारा निधी हा कालवे दुरुस्तीसाठी पुरा पडू शकतो, परंतु खात्याच्या उदासिन धोरणांमुळे 
भ्रष्टाचारामुळे संबंधित कारभाराविषयी प्रश्न निर्माण झाला आहे.
शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात
संबंधित खात्यामुळे अधिकारी कधीही वाई-पाटबंधारे खात्याच्या ऑफिसमध्ये माहिती घेण्यासाठी उपलब्ध नसतात. वाई तालुक्यात अधिकारी सातारच्या मेन ऑफिसला मिटींगच्या नावाखाली थांबतात. हा पाटबंधारे खात्यालाही न सुटलेला विषय आहे. तरी संबंधित खात्याच्या अधिकऱयांनी पाटकऱयांवर विसंबून न राहता वाई व जावली तालुक्यातील कालव्याची पाहणी करुण दुरुस्ती संदर्भात ठोस पावले उचलावीत व कायमस्वरुपी पॅनॉलची दुरुस्ती करावी अन्यथा वाई व जावली तालुक्यातील शेतकऱयांची संपूर्ण जमीन पॅनॉलवर अवलंबून आहेत, असे शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत.

Post a Comment

 
Top