0
नवी  दिल्ली :येत्या एक जानेवारीपासून काही डेबिट आणि क्रेडिट कार्ड बंद होण्याच्या मार्गावर आहेत. देशातील शिखर बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) दिलेल्या आदेशानुसार मॅग्नेटीक स्ट्रीप कार्ड बंद होऊन त्या जागी ईएमव्ही चिप आणि पिन असलेली डेबिट आणि क्रेडिट कार्ड अस्तित्वात येतील. जुनी कार्ड बंद होणार असली तरी वापरकर्त्यांना घाबरण्याचे कारण नसून त्यांच्याकडे बराच अवधी बदलून घेण्यासाठी शिल्लक आहे.

नवीन ईएमव्ही कार्डमध्ये अधिक सुरक्षा असून त्यामुळे फसवेगिरी होण्याची शक्यता फार कमी आहे. आरबीआयने याबाबत तीन वर्षांपुर्वीं म्हणजेच २७ ऑगस्ट २०१५ मध्ये कार्ड बदलण्याबाबत आदेश काढल होते. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी दिला होता. आरबीआयने १ सप्टेंबर २०१५ पासून नवीन कार्ड (डेबिट आणि क्रेडिट) स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ईएमव्ही चिप असलेली हवीत असा आदेश दिला होता. आरबीआयकडून हा आदेश मिळाल्यानंतर बँका कार्ड अपडेट करण्यास वारंवार ग्राहकांना संदेश पाठवत आहे. 
जाणून घेऊया ईएमव्ही आहे तरी काय  चीपवर आधारित डेबिट आणि क्रेडीट कार्ड तुलनेत अधिक सुरक्षित असून ती आता सुरक्षित मानली जातात. ईएमव्ही (यूरो पे, मास्टर कार्ड आणि व्हिसा) ही एक मायक्रो चीप असून फसव्या ट्रान्झेक्शनपासून अधिक सुरक्षित आहे. 
ईएमव्ही आहे की नाही कसे ओळखावे? 
आपल्याकडील डेबिट आणि क्रेडिट कार्ड ईएमव्ही आधारित आहे की नाही हे ओळखणे फारच सोपे आहे. ईएमव्ही कार्डच्या वरील बाजूस डाव्या बाजूला गोल्डन रंगाची छोटीसी चीप असते.  
मॅग्नेटीक आणि ईएमव्ही कार्डमध्ये फरक काय?
ईएमव्ही चीप आणि पिन (पर्सनल आयडेंटीफिकेशन नंबर) ची रचना फसवेगिरी टाळण्यासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे त्याची डमी बनवणे कठिण आहे. चीप आणि पिन कार्डमध्ये अत्याधुनिक एनस्क्रिप्शनची रचना करण्यात आली असून त्यामुळे अवैध देवाण देवाण होऊच शकत नाही. कार्ड हरवल्यास किंवा चोरी झाले तरी फ्राँड होण्यापासून वाचवते. 

Post a Comment

 
Top