0
मुंबई- 25 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे अयोध्येला  जाणार आहेत. त्यावेळी ते तिथे सभा घेणार असल्याचीही चर्चा होती. परंतु आता ते तिकडे जाऊन सभा घेणार नसल्याचं शिवसेनेनं स्पष्ट केलं आहे. अयोध्येत सभेसाठी परवानगी मागितलीच नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे अयोध्या दौऱ्यात उद्धव ठाकरेंची कोणतीही सभा होणार नाहीत. उद्धव ठाकरेंच्या नियोजित दौऱ्यात सभेचं आयोजन नाही. अयोध्येत राम मंदिर लवकर बांधावे ही शिवसेनेची जुनी मागणी धसास लावण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख येत्या 24 नोव्हेंबरला दुपारी खास विमानाने अयोध्येला जाणार आहेत.
चलो अयोध्येचा नारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केला होता. त्यानुसार 25 नोव्हेंबरला चलो अयोध्या असा नारा देत शिवसेनेने राज्यात जोरदार शक्ति प्रदर्शन करत जय्यत तयारी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शिवसेनेचे निवडक 100 नेते अयोध्येला 24 तारखेला जाणार असून राज्यातून सुमारे 25000 शिवसेनेचे निवडक पदाधिकारी अयोध्येला जाणार आहेत. तर मुंबईसह राज्यातील शिवसेनेच्या आमदार व प्रमुख पदाधिकाऱ्यांवर राज्यातील महाआरतीची जबाबदारी टाकण्यात आल्याचे समजते.याव्यतिरिक्त राज्यातून हजारो शिवसैनिक अयोध्येला आपली वाहने, रेल्वे, विमानाने जाणार आहेत. रेल्वे आणि विमानाची सर्व तिकीटे आधीच संपली आहेत. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची संपूर्ण जबाबदारी शिवसेनेचे संसदीय नेते संजय राऊत यांच्यावर आहे, तर लखनऊपासून ते अयोध्ये पर्यंतची जबाबदारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री(उपक्रम)एकनाथ शिंदे यांच्यावर आहे. राज्यातून हजारो शिवसैनिक अयोध्येत जाणार आहेत.Uddhav Thackeray will not taken sabha in Ayodhya- Sanjay Raut | उद्धव ठाकरे अयोध्येत सभा घेणार नाही- संजय राऊत

Post a comment

 
Top