बरेली (यूपी) - बदायूं रोडवरील एका खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल असलेल्या अल्पवयीन मुलीवर गँगरेपची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना बदायूं रोडवरील एका खासगी रुग्णालयात घडली आहे. गँगरेपनंतर तीन दिवसांपर्यंत मुलगी तडफडत होती. शुक्रवारी, 2 नोव्हेंबर रोजी तिने या पूर्ण घटनेची माहिती आपल्या आजीला दिली. यानंतर पोलिसांनी शनिवारी (3 नोव्हेंबर) केस दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
असे आहे प्रकरण...
एका रिपोर्टनुसार, भभौरा परिसरातील एका व्यक्तीच्या 16 वर्षीय मुलीला एका कीटकाचा दंश झाला होता. प्रकृती बिघडल्याने तिला गत सोमवारी बदायूं रोडवरील एका खासगी रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले. येथे तिला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले. बुधवारी तिच्या प्रकृतीत किंचित सुधारणा झाला, परंतु आयसीयूतून डिस्चार्ज मिळाला नाही.
बेडवरच दोरखंडाने बांधले, नशेचे इंजेक्शन देऊन केला गँगरेप
बुधवारी रुग्णालयाच्या पाच कर्मचाऱ्यांनी तिला आधी नशेचे इंजेक्शन दिले, मग ती बेशुद्ध झाली. त्या वेळी तिच्या तोंडावर ऑक्सिजन मास्क लावलेला होता. कर्मचाऱ्यांनी अल्पवयीन मुलीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि हात-पायही बांधून टाकले. यानंतर सर्वांनी तिच्यावर आळीपाळीने रेप केला. रेपच्या घटनेनंतरही पीडिता आयसीयूमध्येच होती. यादरम्यान जेव्हा तिचे वडील भेटायला आले तेव्हा पीडितेने इशाऱ्यामध्ये घटनेबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना कळले नाही. 3 दिवस ती तळमळत होती. शुक्रवारी आयसीयूतून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पीडितेने या घटनेबद्दल आपल्या आजीला सांगितले. माहिती मिळताच कुटुंबीयांनी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालायला सुरुवात केली. रेपच्या आरोप रुग्णालयाच्या एक कंपाउंडर व 4 स्वच्छता कर्मचाऱ्यांवर आहे.

काय म्हणतात पोलिस?
भाजप आमदार राजेश मिश्र यांनी दखल दिल्यानंतर शनिवारी सुभाषनगर पोलिसांत पीडितेच्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एक वरिष्ठ पोलिस अधिकारी म्हणाले की, "पीडितेच्या जबाबावरून केस दाखल करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजसहित इतर पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला जात आहे." तथापि, आतापर्यंत कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी पीडितेला मेडिकल टेस्टसाठी पाठवले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर आरोपींना अटक केली जाईल.

Post a Comment