पुणे - सराईत गुन्हेगाराकडून एक गावठी पिस्तूल व दोन काडतुसे समर्थ पोलिसांनी जप्त केली असून त्याच्याविरोधात गुन्हा नाेंदवून अटक करण्यात आली आहे. सूरज अशोक ठोंबरे (२०, रा. भाजी मंडई, धनगरवाडा, नाना पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सूरज हा कमरेला पिस्तूल लावून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सूरजला ताब्यात घेतले.
या वेळी त्याची अंगझडती घेतली असता एक गावठी पिस्तूल व दोन काडतुसे सापडली. त्याच्याविरोधात समर्थ पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाच्या दोन गुन्ह्यासह तीन, तर फरासखाना पोलिस ठाण्यात दोन असे पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण वायकर यांनी दिली. दरम्यान, यापूर्वी ठाेंबरे याने आणखी कुणाला पिस्तुलची विक्री केली. तसेच त्याचे इतर साथीदार कोण याचाही आम्ही शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment