पुणे- पत्नीकडून घटस्फोट मिळवण्यासाठी डॉक्टर पतीने पत्नीच्या शरीरात सलाईनद्वारे एड्सचा व्हायरस (HIV चे विषाणू) सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात 27 वर्षीय पीडितेने पतीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ही घटना पिंपरी चिंचवडमधील पिंपळे सौदागर परिसरात घडली आहे.
मिळालेली माहिती अशी की, आरोपी डॉक्टर पती हा पत्नीकडे वारंवार हुंड्याची मागणी करत होता. माहेरहून व्यवसायासाठी पैसा आणण्याची मागणी करत होता. यासाठी तो पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळही करत होता. दरम्यान, आरोपी पतीने आधीच पत्नीच्या माहेरच्या मंडळीकडून पैसे घेतले होते. सारखी मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याने पत्नी आजारी पडली. त्यामुळे आरोपी पती तिच्याकडे घटस्फोटाची मागणी करू लागला. परंतु पत्नी त्याला विरोध करत होती. अशातच त्याने पत्नीच्या आजारपणाचा फायदा घेत तिच्या सलाईनद्वारे HIV चे विषाणू सोडले. त्यामुळे पत्नीला HIV ची लागण झाली. ही सगळी बाब लक्षात येताच पीडित पत्नीने यासंदर्भात पोलिसांत पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a comment