0
शासकीय तंत्रनिकेतनमधील टीवाय (सिव्हील)मध्ये शिक्षण घेत असलेल्या आदित्य महानवर याची जीएसपदी निवड करण्यात आली होती. मात्र दोन महिन्यानंतर हे पद रद्द केल्याचे सांगण्यात आले, त्यामुळे हे पद का रद्द केले, असा सवाल करीत, शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांनी त्याचे कारण स्पष्ट करावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष ऋतुराज माने यांनी निवेदनाव्दारे केली आहे.
शासकीय तंत्रनिकेतनमधील जीएस पदाची निवडणुक सप्टेंबरमध्ये झाली होती. या निवडणुका मेरीटनुसार झाल्या, पहिले तीन क्रमांकाचे विद्यार्थी निवडणुकीस इच्छुक नव्हते, म्हणून चवथ्या नंबरच्या आदित्य महानवरची जीएसपदी निवड करण्यात आली होती. पण शनिवारी अचानक इलेक्शन कमिटीने आदित्य महानवरला बोलावून, ही निवड रद्द केल्याचे सांगितले. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करून, संबंधीतांवर कारवाई करावी. तसेच या पदाची फेरनिवड करावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. 

Post a Comment

 
Top