उद्धव ठाकरे ;मला ताकाला जाऊन भांडं लपवायचं नाही, मात्र काही जणांचं भांडाफोड करायचं आहे,' असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. अयोध्या दौऱ्यावर जाताना उद्धव ठाकरे हे शिवनेरी किल्ल्यावरील माती घेऊन जाणार आहेत. त्यासाठी शिवनेरीवर पोहचल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे.
'अयोध्याला जाऊन मी सभा घेणार नाही. तिथं साधू-संतांचा आशीर्वाद घ्यायला निघालोय. शरयू नदीच्या आरतीत सामील होणार,' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपल्या अयोध्या दौऱ्याबाबत माहिती दिली.
विरोधकांवरही जहरी टीका
'टीका करणाऱ्या विरोधकांची किती लायकी आहे, हे मला माहीत आहे, विरोधकाना काय बोलायचं ते बोलू द्या,' असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर केला आहे. 'प्रथम बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बांधा, मग राम मंदिर,' असा सल्ला देत विरोधकांनी उद्धव ठाकरे यांना अयोध्या दौऱ्यावरुन चिमटा काढला होता. त्याला उद्धव ठाकरे यांनी हे प्रत्युत्तर दिलं आहे.

Post a Comment