0
कोल्हापूर जिह्यातील हंगामी स्थलांतरीत, वीटभट्टी, ऊसतोड व गुऱहाळघरातील कामगारांच्या शाळाबाह्य बालकांचा सर्व्हे करून त्यांना शाळेच्या प्रवाहात आणावे या मागणीचे निवेदन स्वाभिमानी बालहक्क अभियान संघटनेच्यावतीने प्राथमिक उपशिक्षणाधिकारी जे.एस.लोहार यांना दिले.
निवेदनामध्ये म्हटले आहे, स्थलांतरीत विद्यार्थ्यांना जि.प.शाळेतून 1 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असलेल्या ठिकाणी प्रवासाची मोफत सोय करावी. जिह्यातील विटभट्टी मालकांना विटभट्टीवरील 6 ते 14 वयोगटातील बालकांना जवळील जि.प.शाळेमध्ये दाखल करण्याबाबतचे लेखी आदेश व सूचना द्याव्यात. वीटभट्टीवरील 6 ते 14 वयोगटातील मुलांच्या संदर्भात तहसीलदारांसोबत शिक्षण विभागाने बैठक घ्यावी. ायामध्ये वीटभट्टी मालक व अवनि संस्थेलाही सहभागी करून घ्यावे. हंगामी स्थलांतरीत शाळेत दाखल केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण, सर्वंकष मूल्यमापन करून त्यांना शिक्षणहमी कार्ड द्यावे. यावेळी अनुराधा भोसले, साताप्पा मोहिते, जैनुद्दीन पन्हाळकर, निमेश गवळी, अमर कांबळे, वनिता कांबळे, सचिन ठाणेकर, विक्रांत जाधव, शर्वरी इंगवले आदी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top