0
बेळगावात मूकफेरीची सांगता होत असतानाच काही तरुणांच्या गटाने फटाके फोडल्याने लाठीमार करून जमावाला पांगविण्याचा प्रकार पोलिसांनी केला. दुपारी 12 च्या सुमारास गोवावेस येथे घडलेल्या या घटनेने शांततेच्या मार्गाने झालेल्या मूकफेरीला गालबोट लागले. मूकफेरी गोवावेस येथे आली असता प्रचंड संख्येने तरुण चौकात जमले होते. याचवेळी राज्योत्सव मिरवणुकीतून बाहेर पडून धुडगूस घालणारे लाल-पिवळे ध्वज घेतलेल्या युवकांचे टोळके तिथे येऊन धडकले. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखून धरून दुसऱया मार्गाने पाठविण्याची तयारी सुरू केली होती. इतक्मयात लाल-पिवळा घेतलेला एक तरुण गोवावेसच्या दिशेने शिरू लागल्यामुळे पोलिसांनी त्याला पकडून बेदम चोप दिला. हा चोप दिला जात असताना काही मराठी तरुणांनी आपल्याच सहकाऱयाला पोलीस मारत असल्याचा समज झाला. यावेळी पोलिसांनी मूकफेरीत सहभागी झालेल्यांवर लाठीचार्ज केला. याचवेळी गोंधळ उडाल्याने एसपीएम रोडवर फेरी येण्यापूर्वी लाल-पिवळे ध्वज घेऊन फिरणाऱया तरुणांचे टोळके गोंधळ माजविण्याचा प्रयत्न करत होते. या ठिकाणी संघर्ष होण्याची शक्मयता लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांना हाकलून लावले. इतर ठिकाणीही अशा एक-दोन घटना घडल्या आहेत.  

Post a Comment

 
Top