0

अखिल महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री शंभू महादेव मंदिरात यंदा दसरा उत्सव अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी दुपारच्या वेळी दररोज महापूजा, साग्रसंगीत करण्यात आले. शंभू महादेवाच्या पालखीची गावातून ढोल-ताशांच्या गजरात व शंख-शिंगतुतारीच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली.
 या उत्सव काळात शिवपिंडीवर महाभिषेक महापूजा करण्यात आली. यावेळी शिवभक्तांना दर्शनासाठी चांदीची मेखला व मुखवटे दिवसभर ठेवण्यात आले होते. राजघरण्यासह सर्वांसाठीची अभिष्ठचिंतन प्रार्थना करण्यात आली, तर सायंकाळी सदरसोपा शिवस्मारक पाठीमागे पोलीसपाटील, ज्येष्ठ नागरिकांसह तरुणांनी सीमोल्लंघन कार्यक्रम उत्साहात पार पडला. रात्री भांडरगृह मठातून देवभेट करण्यात आली. तसेच फुलांनी सजावट केलेली पालखी शंभू महादेवासह छत्रपती स्मरकास भेटावयास नेली. याप्रसंगी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती.
 पालखी सोहळा यशस्वीतेसाठी भांडरगृह मठाचे सिद्धलिंग शिवा
चार्य, पोलीसपाटील संतोष बोराटे, महानाडकर वडील घरातील दीपकराव बडवे, तंडे आण्णा, देवस्थान समितीचे मोहन बडवे, अमोल बडवे, रुद्रा स्वामी, मोहन पवार, साळी, माळी, कोळी, कोष्टी, विश्वनाथ दांगट, संतोष बडवे, संदीप बडवे, प्रमोद बडवे, मधूआणा, विवेक बडवे, विकी देवकर, बजरंग कोळी, अमित बडवे, श्रीकांत बडवे, हरी बनसोडे, सेवधारी बाळाबाई, यमुनाबाई आदींनी परिश्रम घेतल

Post a Comment

 
Top