0
  • Indian Navy commander arrested in Pune for uploading nude photo of his wifeपुणे- पत्नीचे आक्षेपार्ह फोटो इंटरनेटवर अपलोड केल्याच्या आरोपात इंडियन नेव्हीच्या एका कमांडरला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पीडित महिलेने पोलिसांनी सांगितले की, आरोपी मागील 11 वर्षांपासून पॉर्नोग्राफीच्या आहारी गेला आहे. पॉर्नोग्राफीचे व्यसन सोडवण्यासाठी तिने अनेक प्रयत्न केले, मात्र, तिला त्यात यश आले नाही. दरम्यान नेव्ही कमांडरवर आपल्या सहकारींच्या पत्नींचे फोटो एडिट करून इंटरनेट अपलोड केल्याचाही आरोप आहे.
    पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी कमांडर सध्या दिल्लीत कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी त्याचे पत्नीसोबत कडाक्याचे भांडण झाले होते. त्यानंतर ती पुणे येथे माहेरी आली होती. पीडित महिलेने पोलिसांत पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. आरोपीला दोन मुले आहेत.

    पत्नीने पतीवर केले गंभीर आरोप...
    महिलेने तिच्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. पती पॉर्नोग्राफीचा एडिक्ट आहे. तो महिलांचे फोटो एडिट करून इंटरनेटवर अपलोड करतो. पतीच्या या कृत्याने संपूर्ण कुटूंब त्रस्त झाले आहे. अनेकदा पतीला डॉक्टरांकडे दाखविले. परंतु त्याचा काही एक उपयोग झाला नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आरोपीचे विवाहबाह्य संबंधही समोर आले होते. नंतर महिलेने फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्जही दाखल केला आहे.

Post a Comment

 
Top